In which dishes to use cumin seeds or mustard seeds or could we use them together?


       प्राचीन काळापासून भारतात मोहरी आणि जिरे गरम मसाल्यात वापरले जाणारे महत्वाचे पदार्थ आहेत. 
       भारतीय जेवणा मधे मोहरीचा आणि जिऱ्याचा सर्वत्र आणि भरपूर प्रमाणात उपयोग केल्या जातो.  जिरे किंवा मोहरी शिवाय भारतीय स्वयंपाक अधुराच आहे. 

      जिरे आणि मोहरी जर आमटी किंवा भाजीमधे न टाकता जर स्वयंपाक केला तर जेवण चविष्ट लागणारच नाही. 
        मोहरी हा आमटी आणि लोणच्यात वापरण्यात येणारा महत्वाचा घटक आहे मोहरी शिवाय लोणचं अधुरं आहे. जगात जवळ जवळ सर्वच देशात मोहरीचा उपयोग केल्या जातो. आणि भारतात तर प्राचीन काळापासून आपण मोहरीचा वापर करतो आहे. 
      मोहरीच पीक भारतात सर्वत्र होते. मोहरी लागवडी साठी माती व रेती मिश्रित जमीन आणि काळी जमीन अनुकूल असते.
      मोहरीची रोप एक ते दीड फूट उंच असतात या रोपाला पिवळ्या रंगाची फुले येतात व शेंगा लागतात या शेंगा मधेच मोहरीचे दाणे असतात हे दाणे फार बारीक असतात. 
     मोहरी मधे 3 प्रकार आढळतात, काळी मोहरी, पांढरी मोहरी आणि लाल किंवा तांबडी मोहरी. 
     जिऱ्याचा तडका मारून मोहरीच्या पानांची भाजी फार चविष्ट लागते , ही भाजी पित्तकारक, वायू कफ व कृमी नाशक आहे. 
      भारतात बरेच ठिकाणी गृहिणी मोहरी आणि जिऱ्याची पावडर करुन त्यात लिंबाचा रस टाकून गोळा बनवून ठेवतात  आणि त्याचा उपयोग भाजी किंवा विविध पदार्थ बनवताना वापरतात. याने पदार्था ला एक वेगळीच चव येते व पदार्थ रुचकर बनतो.
      मोहरी आणि जिऱ्याची चिमूटभर पावडर जर रोज पाण्यात घेतली तर जठरातील क्रियेचा वेग वाढून भूक चांगली लागते.
       विदर्भ आणि खान्देशात तेलामध्ये जिरे आणि मोहरीचा तडका मारून त्यात हिंग आणि लाल तिखट टाकून खिचडी सोबत खातात त्याने खिचडीला चांगली चव येते. 
      मोहरी आणि जिऱ्याची पावडर गरम गरम पोळीवर लाऊन खाल्यास सर्दी बरी होते.
      जिरे आणि मोहरीची फोडणी करून  ताक पिल्यास ते शरीरातील सर्व विकारांवर गुणकारी आहे .तसेच पोटशूळ , वायू विकार इत्यादी आजारावर अत्यंत गुणकारी मानले जाते.

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन