शक्तीवर्धक पालक
शक्तीवर्धक पालक सर्वाना परिचित असणारी पालेभाजी म्हणजे पालक लहानांन पासुन ते मोठ्या पर्यंत ही भाजी आवडीची भाजी आहे, आपण सर्वच जण पालकची भाजी खाउनच मोठे झालो आहोत असे म्हणायला हरकत नाही कारण आपल्या घरातील बुजुर्ग मंडळी आपल्याला लहानपणा पासुन सांगत आले आहेत की पालक भाजी खाल्याने खुप ताकद, येते शक्ति येते, पालक खात जा तुला स्ट्रॉंग व्हायचं ना? तसेच लहान असताना कार्टुन मध्ये सुद्धा पालक खाल्याने खुप ताकद येते हे पण आपण कार्टुन बघूनच ही पाले भाजी मोठ्या आवडीने खाल्ली आहे. पालेभाज्यांमध्ये पालकची भाजी गुणांनी श्रेष्ठ मानली जाते कारण या भाजीत आरोग्यदायी गुण सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतात. भारतात प्राचीन काळापासून पालकची लागवड केली जाते तसेच युरोप अमेरिका व आशियातील काही भागा मध्ये पालकची लागवड मोठ्या प्रमाणात केल...