जेष्ठा गौरी आवाहन
जेष्ठा गौरी आवाहन अग या गवरीच्या महिन्यात लागली गवर गवर गवर फुलायला बंधू लागला लागला बोलायला जातो बहिणीला आणायला गणपतीच्या बाप्पा च्या आगमना बरोबरच गौरी चा सण महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी माहेरवासी साठी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण करतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात. घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर सर्व जण वाट बघत असतात ती गौरींच्या आगमनाची. भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे गौरी किंवा महालक्ष्मी दरवर्षी ज्येष्ठा गौरीचे आवाहन भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर केले जाते. यंदा भाद्रपद सप्तमी मंगळवारी 25असून अनुराधा नक्षत्र दुपारी 1 वाजून 59 मिनिटांनंतर आहे. त्यामुळे दुपारी दोननंतर घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. गौरीपूजन भाद्रपद अष्टमीला ज्येष्ठा नक्षत्रावर केले जाते. बुधवारी 26 ज्...